
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी (2021-22) आज (दिनांक 5 एप्रिल 2021) पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीमती संध्या दोशी (सक्रे) या 13 मते मिळवून विजयी झाल्या आहेत.
महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या निवडणुकीमध्ये श्रीमती संध्या दोशी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पंकज यादव (भाजप) यांना 9 मते मिळाली. एकूण सदस्यांपैकी 22 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तर चार जण तटस्थ राहिले.
तत्पूर्वी, अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत श्रीमती आशा सुरेश कोपरकर (काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.





























































