
देशातील सर्वोत्तम शाळांच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात वरळी येथील पालिका शाळेने 10 सर्वोत्तम शाळांमध्ये चौथा क्रमांक पटकावला तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून पालिका शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे.
बंगळुरू येथे आज एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या संस्थेने देशभरातील 2020-21च्या स्पूल रँकिंगची घोषणा केली. देशातील 2 हजार सर्वोत्तम शाळांची विविध श्रेणीत निवड केली. शाळांचा शैक्षणिक स्तर, शिक्षकांचा दर्जा, विद्यार्थ्यांवरील वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना मिळणाऱया सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, क्रीडा तसेच डिजिटलायझेशन अशा 14 विविध पातळ्यांवर ही निवड करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने 1999 साली वरळीतील मुंबई पब्लिक इंग्लिश स्पूल ही शाळा सुरू केली.
दरम्यान, मुंबई आयआयटीच्या केंद्रीय विद्यालयानेही वरळी पब्लिक स्पूलसह संयुक्तपणे चौथा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणात पहिला क्रमांक त्रिवेंद्रमपूर येथील केंद्रीय विद्यालय, दुसरा क्रमांक नवी दिल्ली, द्वारका येथील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय, तिसरा क्रमांक कोझीकोडे येथील जीव्हीएचएसएस (मुलींची शाळा) या शाळांनी पटकावला आहे.
‘देशातील 10 सर्वोत्तम शाळांच्या यादीत वरळी सी-फेस येथील पब्लिक स्पूलने चौथा क्रमांक पटकावून अत्यंत काैतुकास्पद कामगिरी केली आहे. पालिका शिक्षण विभागाच्या दमदार कामगिरीबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन!’ – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री
























































