तावडे जमीं पर, शाळांची सुट्टी महापालिका ठरवणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

शहर आणि उपनगरात यापुढे अतिवृष्टी झाल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका घेणार आहे. शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी आज हे स्पष्ट केले. मुंबईत काही ठिकाणीच पाणी साचले असून सर्वच शाळांना सुट्टी देण्याची गरज नसल्याचे मंगळवारी तावडे यांनी म्हटले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर आज तावडे यांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन आपली चूक सुधारली.

तावडे यांची चमकोगिरी
पालिकेत आढावा घेण्यासाठी आलेले विनोद तावडे मराठी कलाकारांना घेऊनच आपत्कालीन विभागात शिरले. या विभागात महत्त्वाच्या व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही सुरक्षेच्या कारणास्तव सोडले जात नाही. अभिनेत्री मधुरा वेलणकर, नाट्यनिर्माता प्रसाद कांबळी यावेळी त्यांच्यासोबत होते. यावेळी आपत्कालीन कक्षात पत्रकारांनाही प्रवेश देण्यात आला नाही, मात्र कलाकारांना प्रवेश देण्यात आला.