Cyclone Michaung : मिचाँग चक्रिवादळामुळे चेन्नईत अडकलेला आमिर खान, फोटो होत आहेत व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिचाँग चक्रिवादळाचा फटका तामिळनाडूला बसला असून मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आणि चैन्नईसह अनेक ठिकाणी हाहाकार माजला. या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याने अनेकजण अडकले होते. मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिकांमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विष्णू विशालसह पत्नी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांचा समावेश होता. अग्निशमन आणि बचाव पथकाने सुरक्षित त्यांना बाहेर काढले. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत,

सुरक्षितठिकाणी आल्यानंतर, अभिनेता विष्णू विशाल यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहीलेय की, पाणी माझ्या घरात घुसले होते आणि करापक्कम येथे पाण्याची पातळी वाढत चालली होती. त्यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर बचाव पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी विष्णु विशाल, ज्वाला गुट्टा यांच्यासह तिथल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यासाठी अग्निशमन दल आणि बचाव पथकाचे आभारही मानले आहेत. त्यांनी बचाव केलेल्या नागरीकांमध्ये विष्णु विशाल ज्वाला गुट्टासह अभिनेता आमिर खानही होता. त्यांनी बचावलेल्या नागरिकांचा फोटो घेतला त्यावेळी त्यात आमिर खानही दिसत आहे. काही लोकं सांगत आहेत की, ते इथे शुटींगसाठी आले. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे त्याची आई आजारी असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत म्हणून आला आहे. मात्र विष्णू विशालला वाचविण्यात आले त्यावेळी आमिर खान त्याच्यासोबत होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशाल यांच्याशी संपर्क न झाल्याने त्याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करापक्कम मध्ये विष्णू विशाल ज्या अपार्टमेण्टमध्ये होता त्याच अपार्टमेण्चमध्ये आमिर खानही होता. वाचवण्यात आलेल्या लोकांमध्ये बॅडमिंटन खेळाडू आणि अरजुन पुरस्कार विजेता ज्वाला गुट्टा होती. सार्वजनिक उपक्रम एनएलसी इंडियाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, चेन्नई महानगरपालिकेच्या प्रयत्नांना पूरक म्हणून, काल NLC इंडिया लिमिटेडने 16 प्रचंड उच्च क्षमतेचे पंप पाठवून मदतीचा हात पुढे केला आहे.