#corona विरुद्धच्या युद्धात बॉलिवूडही सहभागी, पाहा व्हिडीओ

508

चीनमधून सगळ्या जगात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता देशातही हातपाय पसरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात असून कोरोनाविरुद्धच्या युद्धात जिंकण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या युद्धात आता बॉलिवूडकरही सामील झाले आहेत.

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनावर मात करण्यासाठी 22 मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत जनता कर्फ्यु लावण्यात येणार आहे.  अमिताभ बच्चन यांनी काही वेळापूर्वीच या कर्फ्युला समर्थन जाहीर केलं होतं. त्यानंतर आता तमाम बॉलिवूडकरांनी कोरोनाविषयी जनजागृती करणारा व्हिडीओ तयार केला आहे. त्यात अमिताभ बच्चनापासून ते आलिया भट पर्यंत तमाम कलाकार या व्हिडीओत दिसत आहेत. कोरोना विषयी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन कलाकारांनी या व्हिडीओतून केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या