मुंबईसह देशभर बॉम्बस्फोट घडवण्याचा कट उधळला;  राजधानीसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून 6 अटकेत

ऐन सणासुदीत मुंबईसह देशातील इतर प्रमुख महानगरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे.  दिल्लीसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फटके व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. या कटामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या सांगण्यावरून दहशतवादी रामलीला आणि नवरात्रोत्सवात बॉम्बस्पह्ट घडवण्याच्या तयारीत होते.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पत्रकार परिषदेत या मोठया कारवाईची माहिती दिली. दहशतवाद्यांचे नेटवर्क विविध राज्यांमध्ये पसरले होते. दिल्ली पोलिसांनी मागील महिनाभर मल्टीस्टेट ऑपरेशन चालवले. ठिकठिकाणी कारवायांचा धडाका लावला आणि विविध राज्यांतून 6 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

दोघांना पाकिस्तानात 15 दिवसांचे प्रशिक्षण

ऐन सणासुदीत हिंदुस्थानात मोठी जीवितहानी घडवण्याचा पाकिस्तानचा कट होता. यासाठी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात बॉम्ब बनवण्याचे आणि एके-47 चालवण्याचे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन दहशतवादी एप्रिल महिन्यात मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानला नेण्यात आले.

पहिली अटक महाराष्ट्रातून

दहशतवाद्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करताना पहिली अटक महाराष्ट्रातून करण्यात आली. सर्वात आधी दहशतवादी सालेमला पकडण्यात आले. दोघांना दिल्लीतून अटक केली, तर उत्तर प्रदेशातून तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तसेच बांग्ला बोलणाऱया इतर 15 जणांनाही दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याचाही संशय आहे.

दाऊदच्या भावाने असा रचला कट

  • अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांचे दोन ग्रुप बनवले होते. एका ग्रुपला दाऊदचा भाऊ अंनिस इब्राहिम सूचना देत होता. सीमेपलीकडून शस्त्रास्त्रs आणून ती वेगवेगळ्या राज्यांत पाठवण्याची या ग्रुपवर जबाबदारी सोपवली होती. हा ग्रुप सणासुदीत स्फोट घडवण्यासाठी जागोजागी शस्त्रास्त्रs ठेवणार होता. रामलीला आणि नवरात्रीत गर्दी होणारी ठिकाणे निशाण्यावर होती.
  •  शस्त्रास्त्रे आणणाऱया ग्रुपला पैसे पुरवण्याची जबाबदारी दुसऱया ग्रुपवर होती. हवालाच्या माध्यमातून पैसे आणणे व ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचते करणे ही जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. दहशतवाद्यांना हवी ती सगळी मदत पुरवण्याचे काम या ग्रुपवर सोपवले होते.
आपली प्रतिक्रिया द्या