भरधाव ट्रकच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱया पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुधाळतिट्टा – राधानगरी रस्त्यावरील कागल तालुक्यातील बोरवडे फाटा येथे ही घटना घडली आहे.

भैरवनाथ अप्पासाहेब पाटील (वय 45) व त्यांची पत्नी पूनम (वय 40, दोघे रा. कोडणी, ता. निपाणी ) अशी मृतांची नावे आहेत. ट्रकचालक विठ्ठल शिवाप्पा झिपरे (वय 25, रा. खडकलाट) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भैरवनाथ पाटील व त्यांची पत्नी पूनम हे दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवीच्या दर्शनानंतर कोडणीकडे निघाले होते. राधानगरीकडे निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात पाटील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर फरार झालेल्या  ट्रकचालक झिपरे याला मुरगूड पोलिसांनी पाठलाग करून पकडले.