अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट; क्वॉरंटाइन झाल्याचं केलं ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन करून घेतले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हाइट हाऊस हादरले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी असलेल्या मेलानिय ट्रम्प यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दोघांचा रिपोर्ट अद्याप हाती आलेला नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनी सध्या क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

होप हिक्स या ट्रम्प यांच्या खासगी सल्लागार आहेत. त्या नियमितपणे ट्रम्प यांच्यासोबत एअर फोर्स वनमधून प्रवास करतात. होप हिक्स नुकत्याच आपल्या अन्य वरिष्ठ सहकाऱ्यांसह प्रेसिडेंट डिबेट करीता क्लीवलँड येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची तपासणी झाली होती. यात त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. व्हाइट हाऊसने एक पत्रक काढून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपली आणि अमेरिकेसाठी काम करणाऱ्या सर्व लोकांच्या प्रकृतीची तसेच संरक्षणाची काळजी करतात आणि जातीनं यात लक्ष देतात असे स्पष्ट केले आहे.

होप्स हिक्स कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, ‘होप हिक्स, ज्यांनी एकही सुट्टी न घेता सतत कार्यरत आहेत आणि आता त्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. फर्स्ट लेडी आणि मी आपल्या टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. तरी आम्ही दोघांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.’

दरम्यान, जागतिक मीडियाचे लक्ष आता ट्रम्प दांपत्याच्या रिपोर्टकडे आहे.