
मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका संवर्गास 5 दिवसांचा आठवडा, आठवड्याला 2 रजा लागू करून घेण्यासाठी सोमवार, 15 मे रोजी सकाळी 10 वाजता सर्व रुग्णालयातील परिचारिका संवर्ग गणवेश परिधान करून एफ/दक्षिण विभाग कार्यालय, परळ येथे बहुसंख्येने आंदोलनात सामील होणार आहेत.
तत्पूर्वी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांनी मंगळवारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘अभी नही तो, कभी नहीं’ हे जाणून सामुदायिक रजा आंदोलनाची पूर्वतयारी बैठक घेतली. सदर बैठकीस सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल, उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, सुभाष पवार, चिटणीस वृषाली परुळेकर, हेमंत कदम, अजय राऊत, सल्लागार हरिदास जामठे यांनी मार्गदर्शन केले, तर अध्यक्ष बाबा कदम यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना परिचारिकाच्या कायम पाठीशी राहील, असे आश्वासित केले.





























































