बुलढाणा – अल्पवयीन मुलीची हत्या, छिन्नविछिन्न अवस्थेत घराजवळ सापडला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

बुलढाणा येथून जवळच असलेल्या रायपूर येथे एका 16 वर्षीय तरुणीची हत्या डोक्यात दगड घालुन करण्यात आली आहे. सपना अंबादास जमधाडे असे या तरुणीचे नाव असून ती दहावीच्या वर्गात शिकत होती.

छिन्नविछिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह तिच्या घराबाहेर असलेल्या बाथरूमजवळ सापडला. विशेष म्हणजे ती जेव्हा बाथरूमसाठी गेली होती. तेव्हा संपूर्ण गावात लाईट गेलेली होती. सदर हत्या आज सायंकाळी सात वाजता झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पथक घटनास्थळी असून डीवायएसपी सुद्धा रायपूर येथे पोहोचले असुन पोलीसांनी तपास सुरू केला आहे. रायपूर परिसरात या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.