बुलढाणा – भरधाव स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, बापलेकासह 3 ठार

भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत रस्त्यालगत उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10.15 वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली.

माऊली कॉलेजजवळ एम.एच. 28-एएन 7265 ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे (30), त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे (50) आणि शेख रज्जाक शेख रहेमान (40) सर्व रा. सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते. तेवढ्यात शेगावहून खामगावकडे जाणार्‍या स्कॉर्पिओ (क्र.एम.एच.15-बीएन 3349) ने धडक दिली. यामध्ये स्वप्नील बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागीच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे उपचारासाठी घेवून जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

शेगाव पोलिसांनी याप्रकरणी शेख रहीम शेख रहेमान (50, रा. शेगाव) यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ चालक सुशिल सिध्दार्थ इंगळे, रा. सातेगांव ता. अंजनगाव सुर्जी याचे विरुध्द अप क्र. 281/20 कलम 304 अ 279, 338, 427 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉनस्टेबल ज्ञानदेव ठाकरे हे करित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या