ओटीपी देण्यापूर्वी मुलं कॅबमध्ये बसली, संतापलेल्या चालकाकडून ग्राहकाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओटीपी देण्यापूर्वी ग्राहकाची मुलं कॅबमध्ये बसल्याने संतापलेल्या चालकाने ग्राहकाची हत्या केली आहे. ही घटना तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे घडली आहे.

ही घटना चेन्नईच्या बाहेरील परिसरात घडली आहे. कोईम्बतूर येथील एका खासगी कंपनीत इंजिनियरच म्हणून काम करणाऱ्या एच. उमेंदर हे आपल्या पत्नी व मुलांसहित चेन्नईत विकेंडसाठी आले होते. रविवारी दुपारी साडे तीन वाजता चित्रपट पाहिल्यानंतर नवलूर येथील एका मॉलजवळ त्यांनी कॅब बुक केली.

कॅबचालक गाडी घेऊन पोहोचला. तेव्हा उमेंदर यांच्यासोबत असलेले सहाही जण गाडीत बसू लागले. तोपर्यंत उमेंदर यांनी कॅबचालकाला ओटीपी सांगितला नव्हता. त्या आधीच त्यांची मुलं गाडीत बसली. त्या कृतीवर कॅबचालक एन. रवी याने आक्षेप घेतला. तो म्हणाला की तुमचं कुटुंब मोठं आहे, तर तुम्ही मोठी गाडी बुक करणं आवश्यक होतं, असं म्हणून त्याने मुलांना ओरडायला सुरुवात केली.

मुलांवर ओरडल्यामुळे उमेंदर आणि रवी यांच्यात वाद सुरू झाला. वाद विकोपाला जाऊन रवीने उमेंदर यांच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. त्यामुळे उमेंदर यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं. उमेंदर यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान लोकांनी कॅबचालकाला पकडून पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी त्याला अटक करून तक्रार दाखल केली आहे.