
शिवसेना शाखा क्रमांक 111च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. भांडुप गावातील दिना बामा पाटील हॉल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दहावी-बारावीतील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवदेखील करण्यात आला.
आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शाखा अधिकारी मंदार गावडे व युवा शाखा समन्वयक नवनाथ कदम यांनी युवा संपर्क अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रख्यात करीअर मार्गदर्शक विष्णु धुरी, शुभम पेडामकर व मर्विन क्लासचे मर्विन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संदीप राऊत, दीपाली पाटील, योगेश पेडणेकर, चारुशिला पाटील, सुमन म्हसकर, दीपक सावंत, रजनी पाटील, सचिन चोरमले, विशाखा भोईर, प्रज्ञा आंबेरकर, अल्पिता वारंग-गावडे, अनिकेत वीरकर, अपूर्वा महाला आदी उपस्थित होते. वैभव जुवेकर, सचिन गायकवाड, सौरभ पालकर, अनमोल जाधव, सागर हडकर, साईल भागडे, भार्गवी चोरमले, दीक्षा भेलेकर, रुषिकेश भेलेकर, रुषिकेश कोळंबेकर, ओमकार दुर्गावले, राज पांचाळ, शशिकांत भोसले, प्रथमेश देवळकर, राहुल कोयंडे, संकेत पाटील, तेजल पालकर, जयदेव सावंत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.



























































