
देशातील कंपन्यांकडून चालू आर्थिक वर्षात सरासरी 8.6 ते 10.2 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईला मागे टाकत चेन्नई सर्वाधिक 9.7 टक्के वाढीसह पहिल्या स्थानी, तर पुणे आणि हैदराबाद 9.6 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी असतील, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.
‘टीमलीज’ने आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा रोजगार आणि वेतन अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, चालू वर्षात देशात सरासरी वेतनवाढ 9.6 ते 10.2 टक्के असेल. विद्युत अभियंत्यांच्या वेतनात सर्वाधिक 11.2 टक्के वाढ होईल. त्याखालोखाल गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक 10.9 टक्के, आयटी कर्मचारी 10.3 टक्के, गुणवत्ता हमी अभियंते 10.2 टक्के आणि प्रकल्प अभियंते 10.2 टक्के अशी वेतनवाढ होईल.




























































