FIFA World Cup 2026 – इराणने बेल्जियमला बरोबरीत रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेल्जियम आणि इराण यांच्यातील फिफा वर्ल्ड कपमधील ‘जी’ गटातील अत्यंत चुरशीच्या सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या सामन्यात बेल्जियमचा बचावपटू नॅथन एन्गॉयला लाल कार्ड दाखवण्यात आल्याने ‘रेड डेव्हिल्स’ना अखेरचा टप्पा दहा खेळाडूंनिशी खेळावा लागला.

स्टार खेळाडू केविन डी ब्रुइन आणि रोमेलु लुकाकु यांच्यासह अनुभवी संघ मैदानात उतरला असला तरी बेल्जियमला विजय मिळवता आला नाही. उलट इराणने शिस्तबद्ध बचावाच्या जोरावर त्यांना रोखून धरले. सामन्याच्या बहुतांश वेळेत चेंडूवरील नियंत्रण बेल्जियमकडे होते, मात्र, धोकादायक संधी निर्माण करण्यात इराणच पुढे राहिला. पहिल्या सत्रात इराणचा स्टार स्ट्रायकर मेहदी तारेमी याने अप्रतिम फ्री किकवर गोल केला होता. मात्र, व्हीएआर तपासणीनंतर तो ऑफसाइड ठरवण्यात आला आणि इराणची आघाडीची संधी हुकली.

बेल्जियमचा गोलरक्षक थिबाउट कोर्टुआ यानेही काही महत्त्वपूर्ण बचाव करत संघाला संकटातून बाहेर काढले. दुसरीकडे, लुकाकूला 36व्या मिनिटाला मिळालेली हेडरची संधी वाया गेली. दुसऱ्या सत्रातही इराणने प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमधून धोका निर्माण केला. ता रेमी पुन्हा एकदा गोलच्या जवळ पोहोचला, मात्र कोर्टुआने त्याचा प्रयत्न हाणून पाडला.