
मानसशास्त्रातील करीअर म्हणजे एक मानसशास्त्रज्ञ बनणे व लोकांना सखोल तात्त्विक मदत करणे होय. आपल्या देशात तसेच परदेशात या व्यवसायाला चांगली मागणी आहे. मानसशास्त्र ही मानवी मनाचा कला, विज्ञान आणि मानवी मनाची कार्ये तसेच विशेषतः दिलेल्या परिस्थितीत वर्तनावर परिणाम करणारे शास्त्र आहे. मानसशास्त्राचा उद्देश व्यक्ती आणि गटांच्या वर्तनांना समजून घेणे. मानसशास्त्रज्ञ मानवी मन, मानवी भावना आणि वर्तनाचा वेगवेगळय़ा परिस्थितींचा लोकांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करतो. तसेच तो मनोवैज्ञानिक विकार आणि समस्यांना तोंड देत असलेल्या लोकांना मदत करतो आणि त्यांना सर्वोत्तम योग्य उपचार तथा मार्गदर्शन करतो.
आपल्या देशात कायदेशीररीत्या समुपदेशक/मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करू इच्छिणाऱयांनी रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियामध्ये (आरसीआय) नोंदणी करणे अनिवार्य आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकॉलॉजिस्ट होण्यासाठी इयत्ता बारावी सायकॉलॉजी विषयासह उत्तीर्ण असल्यास पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत सायकॉलॉजी हा मुख्य विषय अनिवार्य. पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये साधारणता व्यक्तिमत्त्व विकास, सायकोथेरपी, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि न्यूरोसायकॉलॉजी. मुंबई विद्यापीठांतर्गत – सेंट झेवियर्स कॉलेज, के. सी. कॉलेज, रामनारायण रुईया कॉलेज, जय हिंद कॉलेज, रूपारेल कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये पदवीपर्यंत मानसशास्त्र विषयाची सुविधा उपलब्ध आहे. आज विविध क्षेत्रांत सायकॉलॉजिस्ट/कौन्सिलरला मागणी आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, पंझ्युमर सायकॉलॉजिस्ट, क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट, कल्चरल सायकॉलॉजिस्ट, एज्युकेशनल सायकॉलॉजिस्ट, एन्व्हायरमेंटल सायकॉलॉजिस्ट, हेल्थ सायकॉलॉजिस्ट, मीडिया सायकॉलॉजिस्ट, स्पोर्टस् सायकॉलॉजिस्ट, एज्युकेशनल कौन्सिलर, करीअर कौन्सिलर, चाइल्ड अब्युज कौन्सिलर, कम्युनिटी मेंटल हेल्थ कौन्सिलर, मॅरेज अॅण्ड फॅमिली कौन्सिलर, मेंटल हेल्थ कौन्सिलर, रिहॅबिलिटेशन कौन्सिलर यांची मागणी आहे.
समुपदेशक/मानसशास्त्रज्ञ यांची खालील महत्त्वाच्या क्षेत्रांत सेवा अत्यावश्यक –
सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ.
सर्व आरोग्य सेवा देणारी पेंद्रे.
दवाखाने आणि मोठी इस्पितळे.
लोकसेवा देणाऱया पंपन्या.
कौटुंबिक आणि वैयक्तिक स्तरावर.
सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक


























































