INS विक्रांतच्या डेकवर पहिलं जेट लँडिंग; हिंदुस्थानी नौदलाचं मोठं यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
INS-Vikrant--tejas

हिंदुस्थानच्या विमानवाहू INS विक्रांतने त्याच्या फ्लाइट डेकवर विमानाचे पहिले लँडिंग करून एक मैलाचा दगड पार केला. सागरी चाचण्यांचा एक भाग म्हणून हिंदुस्थानचं स्वदेशी विकसित लढाऊ विमान (LCA) तेजस नौदलच्या आयएनएस विक्रांतवर यशस्वीरित्या उतरलं.

‘यानिमित्तानं हिंदुस्थानी नौदलानं आत्मनिर्भर भारतच्या दिशेनं एक ऐतिहासिक टप्पा गाठला. कारण, नौदल वैमानिकांनी INS विक्रांतवर LCA चं लँडिंग केलं. हे स्वदेशी विमानाचे डिझाईन, विकास, बांधकाम आणि संचालन करण्याची हिंदुस्थानची क्षमता दर्शवते.’, असं हिंदुस्थानच्या नौदलानं एका निवेदनात म्हटलं आहे.

₹ 20,000 कोटी खर्चून बांधलेली 45,000 टन वजनाची INS विक्रांत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झाली. 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद असलेली INS विक्रांत ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी युद्धनौका आहे.

ते मिग-29 के लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह 30 विमाने वाहून नेऊ शकतात. या युद्धनौकेत जवळपास 1,600 कर्मचारी सामावून घेऊ शकतात.

INS विक्रांतचे नाव त्याच्या आधीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्याने बांगलादेशच्या मुक्तीसाठी 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती.