
13 वर्षांच्या शाळकरी मुलीने वैशिष्ट्यपूर्ण अॅप तयार केले आहे. अनुष्का जॉली असे या मुलीचे नाव आहे. अनुष्काने अँटी बुलिंग स्क्वॉड (एबीएस) हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ‘कवच’ नावाचे मोबाईल अॅप तयार केले आहे. शाळेत मुलामुलींना कोणी त्रास देत असेल तर त्याची तक्रार ‘कवच’ अॅपवर गुप्तपणे करता येणार आहे. या कामगिरीबद्दल सध्या अनुष्कावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनुष्का जॉली गुरुग्राममधील शाळेत आठवीत शिकते. गेल्या तीन वर्षांपासून ती अँटी बुलिंग स्क्वॉड (एबीएस) चालवत आहे. या मोहिमेचा लाभ शंभरहून अधिक शाळा आणि विद्यापीठांमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना झाला. आता तर ती ‘कवच’ या अॅपद्वारे विद्यार्थ्यांना बुलिंगपासून संरक्षण देण्यास सज्ज झाली आहे.
बुलिंग म्हणजे त्रास देणे, दादागिरी करणे. अनुष्का बुलिंगविरोधात जनजागृती करते. एबीएस प्लॅटफॉर्म चालवत असताना अनुष्काच्या लक्षात आले की, अशा घटनांची तक्रार नोंदवली जात नाही. त्यामुळे त्यावर कारवाई केली जात नाही. परिणामी बुलिंग करणाऱयांना अजून प्रोत्साहन मिळते. म्हणून अशा घटनांना बळी पडलेले विद्यार्था तसेच पालक यांनाही आपले नाव गुप्त ठेवून तक्रार करता यावी यासाठी एखादी सुधिवा उपलब्ध केली पाहिजे असे तिला वाटले. त्यातूनच ‘कवच’ मोबाईल अॅप तिने तयार केले. लवकरचे हे अॅप सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
कशी झाली रुजवात…
पाच वर्षांपूर्वी म्हणजे अनुष्का जेव्हा नऊ वर्षांची होती तेव्हा एक घटना घडली होती. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळी एका सहा वर्षांच्या मुलीची टिंगल तिच्यापेक्षा जरा मोठी मुलं करत होती. ती छोटी मुलगी घाबरून गेली होती. अनुष्काच्या मनावर या घटनेचा खोल परिणाम झाला. अनेकदा शाळेतील मोठी मुलं लहान मुलामुलींना त्रास देतात, धमकावतात. त्यामुळे लहान मुले घाबरतात. कुणाला काही सांगत नाहीत. अशा वेळी त्यांना पिंवा पालकांनाही आपल्या मुलाला होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करायची असेल तर ती गुप्तपणे करता यावी यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना अनुष्काच्या मनात आली. अनुष्का सांगते, अनेकांना भेडसावणारी ही समस्या आहे. माझ्या वयाची अनेक लहान मुले अशा त्रासाला बळी पडतात आणि आत्मविश्वास गमावून बसतात. यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं मला वाटू लागलं. त्यातूनच मी अँटी बुलिंग स्क्वॉड हे व्यासपीठ उभारले.

























































