सपा-बसपाची आघाडी रोखण्यासाठी सीबीआयचा गैरवापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
akhilesh

सामना ऑनलाईन । लखनौ

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात होणारी आघाडी रोखण्यासाठी मोदी सरकार सीबीआयचा गैरवापर करीत आहे, असा गंभीर आरोप सपाचे नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

अखिलेश हे 2012 ते 17 दरम्यान मुख्यमंत्री असताना 2012 मध्ये त्यांच्याकडे राज्याचे खाणकाम मंत्रालयही होते. नेमका याच काळात हमीरपूरमध्ये बेकायदा वाळू उपसा झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआय अखिलेश यांना चौकशीसाठी बोलवू शकते, असे मोदी सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना अखिलेश बोलत होते.सीबीआयला आम्ही घाबरत नाही असे यावर अखिलेश यांनी आज ठणकावून सांगितले. काँग्रेसनेही अशा चौकशा यूपीए सरकारच्या काळात केल्या. आता हेच काम मोदी सरकार करीत आहे, पण मी त्यांना उत्तरे देण्यास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.