शेलू-नेरळदरम्यान डेक्कन एक्सप्रेसमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेलू नेरळदरम्यान डेक्कन एक्सप्रेसचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवांवर याचा परिणाम झाला. ऐन गर्दीच्या वेळी लोकल वाहतूकीचे तीन तेरा वाजल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डेक्कन एक्सप्रेस थांबल्याने त्या पाठोपाठ येणाऱ्या उद्यान एक्सप्रेस सहित अनेक एक्सप्रेस एकापाठोपाठ एक थांबल्या आहेत. या गोंधळामुळे सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेनं सुटणाऱ्या ट्रेन या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर कल्याण ते सीएसएमटी ट्रेन या 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे