
दिवा रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या बांधकामासाठी मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवारपासून सलग तीन रात्री विशेष ट्रफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कळवा ते डोंबिवली स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ धीम्या मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या रात्रीच्या काही लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.
मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारीच ब्लॉक जाहीर करून रात्रीपासूनच ब्लॉकची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांची रात्रीच्या लोकल प्रवासात गैरसोय झाली. हा ब्लॉक रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. सलग तीन रात्री दोन तास (रात्री 1.20 ते 3.20) ब्लॉक घेऊन पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे.



























































