चार्जर वाघाचा संशयास्पद मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiger-

सामना प्रतिनिधी । नागपूर

बहुचर्चित बेपत्ता जय वाघाचा शोध लावण्यात वन विभागास अद्याप यश आले नसताना उमरेड-करांडला या व्याघ्र प्रकल्पाच्या पवनी रेंज कोअर एरियामध्ये चार्जर नावाचा वाघ आज रविवारी सकाळी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळला.

शिकार करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर विषप्रयोग करण्यात तर आला नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चार्जर हा वाघ 7 ते 8 वर्षांचा असून तो स्थलांतरित असल्याचे समजते. उमरेड-करांडला या व्याघ्र प्रकल्पात आज सकाळी काही पर्यटक गाईडसोबत फिरत असताना कोअर एरियामध्ये त्यांना वाघ पडून असल्याचे दिसले.