हवामान खराब असतानाही घेतली चाचणी, पायलट मारियाच्या पतीचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
28 जून मुंबईतील घाटकोपरमध्ये विमान कोसळले, वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच्या घाटकोपरमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या चार्टर्ड विमान दुर्घटनेमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला. या विमान अपघाताबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली असून अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पायलट मारिया कुबेर यांच्या पतीने हवामान खराब असतानाही विमानाची चाचणी घेण्यास सांगण्यात आले असा आरोप केला आहे. मारिया यांचे पती प्रभात कथुरिया खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला आहे.

गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातामध्ये विमानाच्या महिला पायलट मारिया कुबेर, को-पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांच्यासह रस्त्यावरील एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पायलट मारिया कुबेर (४७) या मीरारोडच्या काशीमीरा परिसरातील जयनगर रो हाऊस येथे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पती व मुलीसोबत राहत होत्या. त्यांची मुलगी ११ वीमध्ये शिकत आहे.