छत्तीसगडमध्ये जवानांमध्ये संघर्ष, सहा जवानांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी आयटीबीपीच्या जवानांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात 6 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना हेलिकॉप्टरने रायपूरमधील रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आहे. दरम्यान, मृतांमध्ये दोन हवालदार आणि 4 शिपायांचा समावेश आहे. हे सर्व जवान छत्तीसगडमधील नसून परराज्यातील आहेत.

एसपी मोहित गर्ग यांनीही या घटनेस दुजोरा दिला आहे. तसेच या गोळीबारामागचे नेमके कारण  याचाही तपास सुरू असल्याचे गर्ग यांनी सांगितले आहे.