
हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज 16 ऑक्टोबरला जागतिक खाद्यान्नदिनी 2 हजार 500 किलोचा महाचिवडा तयार केला आहे. रामदासपेठ येथील विष्णूजी की रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत सकाळी 9 ते 11 या वेळेत तयार करण्यात आलेल्या चिवडय़ाचे कांचन गडकरी आणि राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले. विष्णू मनोहर यांनी 14 वा विश्वविक्रम रचून नागपूरच्या मानात तुरा खोचला.
या चिवडय़ासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून 600 किलो चिवडी आणली. चवीसाठी या चिवडय़ात बदाम, काजूही घालण्यात आले. या चिवडय़ासाठी शेंगदाणा तेल 350 किलो, शेंगदाणे 100 किलो, काजू व किसमीस 100किलो, डाळवा व खोबरे प्रत्येकी 50 किलो लागले.
























































