
नैसर्गिक ताडीच्या नावाखाली केमिकलयुक्त ताडी विक्री करणाऱया विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे फौजदारी कारवाई केली जाणार आहे. कारवाईकरिता राज्यभरात खास पथके तयार करण्यात आली आहेत.
राज्यात एकंदरीत 39 लाख ताडाची झाडे आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्टय़ात 35 लाख तर 4 लाख झाडे ही उर्वरित जिह्यात आहेत. उन्हाळ्यात ताडीला प्रचंड मागणी असते. त्याचा फायदा काही माफिया घेतात. शरीराला घातक असलेले क्लोरल हायड्रेड हे विषारी रसायन मिसळून ते ताडीच्या नावाखाली प्यायला देतात. रसायनमिश्रित ताडीच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेत आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अधिकाऱयांची बैठक बोलावून चर्चा केली. चर्चा करून ताडीच्या नावाखाली रसायन मिसळणाऱयाच्या मुसक्या आवळण्याचा सूचना आयुक्तांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत.
कारवाईकरिता खास पथक तयार करण्यात आली आहे. त्यानुसार धडक कारवाई केली जाणार आहे. जर केमिकलयुक्त ताडी आढळली तर त्याचे नमुने काढून ते तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले जातील.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षभरात राज्यात 2 लाख 10 हजार 519 लिटर अवैध ताडी जप्त केली आहे. मुंबईचा विचार केला तर शहरात 4 हजार 37 तर उपनगरात 15 हजार 78 लिटर, ठाण्यात 14 हजार, पालघर 20 हजार आणि नांदेडमध्ये 28 हजार 222 लिटर अवैध ताडी जप्त केल्याची नोंद आहे. असे कृत्य जर कोणी करत असल्यास त्याची माहिती देणाऱयांना पाच टक्के बक्षीस दिले जाणार असल्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले.
n एप्रिल 2019 ते मार्च 2020 पर्यंत राज्यात n 42 हजार 767 गुन्हे दाखल तर 30 हजार 424 जणांना केली अटक
n 21 कोटींनी महसूल वाढल्याची नोंद
n परराज्यातून आलेले 2 लाख 11 हजार 319 लिटर मद्य केले जप्त
n हातभट्टीची 8 लाख 97 हजार 249 लिटर दारू केली जप्त
.































































