
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी 8 जून 1985 रोजी मुंबईनंतर मराठवाड्यात शिवसेनेचे बीज पेरले गेले. बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मराठवावाड्यातील जनतेला 8 जूनच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यात नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, बीड येथे झालेल्या पूर्व तयारी बैठकीत ते बोलत होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे सांगितले की, मराठवाड्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष संभाजीनगरच्या सभेकडे लागले आहे. यामुळे अनेक भागांतून नागरिक येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला खासदार बंडू जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, महिला आर्थिक महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे, संपर्कप्रमुख राजेंद्र सापते, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, कळमनुरीचे आमदार संजय बांगर, जिल्हा परिषद सभापती गंगाप्रसाद अनेराव, महिला आघाडी जिल्हासंघटक शामल वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, शहरप्रमुख सुधीर कदम, उपशहर बापूसाहेब नाईकवाडी, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विभागप्रमुख महादेव पवार, बालाजी पांचाळ, धुळाप्पा रक्षे, युवासेना शहर अधिकारी सागर इंगळे, सुनील खडके, बबन पताडे, संजय सूर्यवंशी, धनंजय शिंदे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

























































