
सामना प्रतिनिधी । बीड
बीड शहरात वीस कोटी रुपये खर्चाच्या शंभर खाटाचे माता बाल अद्यावत रुग्णालयाला आज तांत्रीक मान्यता देण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांची ही मागणी पूर्णत्वास गेली.
बीड शहरातील आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आणि रुग्णांना अद्ययावत सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी १०० खाटाच्या माता बाल रुग्णालयासाठी पाठपुरावा केला होता. शासन दरबारी प्रस्ताव दाखल होता. अखेर या प्रयत्नांना यश आले. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनी केलेल्या प्रयन्त मुळे वीस कोटी रुपयांच्या बाल माता १०० खाटाच्या रुग्णालयास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
































































