अरुणाचलमधील घुसखोरीवर चीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुरापतखोर चीनने अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये आगळीक करण्याचा प्रयत्न केला. चिनी लाल माकडांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंदुस्थानचे जवान भिडले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले. सीमेवर प्रचंड धुमश्चक्री झाली. यात दोन्ही बाजूचे 30 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर सीमेवर तणाव वाढला आहे.

या दरम्यान, चीनने यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एएफपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की चीनच्या म्हणण्यानुसार सीमेवरील परिस्थिती ‘Stable’ (स्थिर) आहे.

2020 मध्ये हिंदुस्थानी आणि चिनी सैन्यात गलवान खोऱ्यात झटापट झाली होती.