चीन युद्धाच्या मूडमध्ये, डोकलाममध्ये मोबाइल हॉवित्झर तोफा तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीजिंग

तिबेटमधील आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू आहेत. तेथील सैन्याला चीन सरकारने मोबाईल हॉवित्झर तोफा पुरवल्या आहेत. 50 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या या तोफा वाहनांमधून कुठेही वाहून नेता येऊ शकतात. अलीकडेच चीनने तिबेटमधील सैन्याला छोटे रणगाडे पुरवले होते.

‘ग्लोबल टाइम्स’ या चिनी दैनिकामध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द झाले आहे. हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांमध्ये डोकलाम सीमेवर वाद झाले होते. त्यानंतर चीनने तेथील आपल्या सैनिकांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवला. आता तिबेट सीमेवरील सैन्यालाही अद्ययावत शस्त्रs आणि रणगाडे पुरवले गेले आहेत. मोबाईल हॉवित्झर तोफा हा त्याचाच एक भाग आहे.

काय आहे मोबाईल हॉवित्झर तोफांमध्ये?
पीएलसी – 181 मोबाईल हॉवित्झर तोफा या 52 कॅलिबरच्या आहेत. 2017 मध्ये डोकलाम वादानंतर तेथील चिनी सैनिकांना या तोफा पुरवल्या गेल्या होत्या. या तोफांनी लेझर आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून लक्ष्याचा अचूक वेध घेतला जाऊ शकतो. तिबेटमधील सैनिकांना देण्यात आलेले छोटे रणगाडेही उंचावरील लक्ष्य टिपू शकतात. तसेच कोणत्याही दिशेला वेगाने वळू शकणारे हे रणगाडे उंच आणि वळणदार मार्गांवरूनही नेता येऊ शकतात.

तिबेटमधील संरक्षण खर्च दुपटीने वाढवला
चीनने तिबेटमधील संरक्षण खर्चही दुपटीने वाढवला आहे. बर्फाळ प्रदेशात सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रs आणि रसद यांचा काहीच तुटवडा पडू दिला जात नसून तिथे सैनिकांसाठी ऑक्सिजन स्टेशनही उभारण्यात आले आहे.