हिंदुस्थानी हद्दीत घुसलेल्या चीनी जहाजाला परत पाठवले; नौदल प्रमुखांची पृष्टी

953

हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत सप्टेंबर महिन्यात चीनी जहाज घुसले होते. नौदलाने त्याला परत पाठल्याच्या वृत्ताला नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दुजोरा दिला आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे शी यान -1 जहाज सप्टेंबर महिन्यात अंदमान- निकोबार द्वीप समूहाच्या इकॉनॉमिक झोनपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय घुसले होते. कोणतीही परवानगी नसल्याने नौदनाने त्यांना देशाच्या सागरी हद्दीच्या बाहेर काढले होते, असे त्यांनी सांगितले.

नौदल कोणत्याही संकटाशी सामना करण्यास सज्ज असल्याचेही ते म्हणाले. नौदलाच्या पायरसीविरोधी मोहिमेतंर्गत 120 सुमुद्री लुटारूंना पकडण्यात आले असून पायरसीच्या 44 घटना उघड झाल्या आहेत. हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत कोणत्याही देशांच्या जहाजांना परवानगीशिवाय प्रवेश करता येणार नाही, यासाठी नौदल सज्ज आहे. हिंदुस्थानच्या सागरी हद्दीत प्रवेशासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. संरक्षण दलात नौदलाच्या कमी होणाऱ्या बजेटबाबातही नौदलप्रमुखांनी चिंता व्यक्त केली. 2012 मध्ये 18 टक्के असणार बजेट 2018 मध्ये फक्त 12 टक्के असल्याचे ते म्हणाले. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात चीनचा वावर वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. नौदल त्यांच्या प्रत्येक हालाचालींवर नजर ठेवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अरबी समुद्रात चीन आणि पाकिस्तानकडून संयुक्त युद्धसराव होणार आहे. त्यावरही नौदलाची नजर आहे. या युद्धसरावासाठी त्यांनी हिंदुस्थानी सागरी हद्दीतून जावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती परवानगी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांचा धोका लक्षात घेता नौदलाने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या