लडाखमध्ये चीनची घुसखोरी

26

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शत्रुराष्ट्राच्या कुरापती रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असताना चीनला मात्र जरब बसलेली नाही. डोकलाम वादाला दोन वर्षे उलटल्यानंतर चीनच्या सैन्याने पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी करत लडाखमध्ये आपला झेंडा फडकावला. स्थानिक लोक तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस साजरा करत असताना चिनी सैन्याने घुसखोरी केली.

जम्मू-कश्मीरच्या लडाखमधील डेमचोक परिसरात सहा किलोमीटर अंतरावर चिनी सैन्य घुसले होते. या सैन्याने त्यांच्या देशाचा झेंडा फडकावल्याचे तेथील सरपंच उरगेन चोदोन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चीनमधील नागरिक तेथील सैन्याचे कपडे घालून हिंदुस्थानच्या नियंत्रण रेषेजवळ आले होते, असे स्पष्ट करत हिंदुस्थानने चीनच्या घुसखोरीचा इन्कार केला.

आपली प्रतिक्रिया द्या