हेमा उपाध्याय खून प्रकरणी चिंतन उपाध्यायला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचा वकील हरेश भंभानी यांच्या खुनाप्रकरणी दोषींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हेमा यांचा पती चिंतन उपाध्याय याच्यासहित तीन जणांना जन्मेठप सुनावण्यात आली आहे. चिंतनखेरीज विजय राजभर, प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर यांच्यावरही या खुनांचा ठपका ठेवण्यात आला होता.

हेमा उपाध्याय आणि हरेश भंभानी यांची हत्या 2015च्या डिसेंबर महिन्यात झाली होती. या दोघांचेही मृतदेह एका कार्डबोर्ड बॉक्समध्ये भरून कांदिवलीत एका नाल्यात फेकून देण्यात आले होते. हे मृतदेह आढळून आल्यानंतर या खुनांना वाचा फुटली होती. या दोन्ही हत्यांचे आरोप हेमा यांचा नवरा चिंतन याच्यावर ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन उपाध्याय याला दोषी मानत त्याच्यासह विजय राजभर, प्रदीप राजभर, शिवकुमार राजभर या तिघांवरही हत्येचा दोष सिद्ध असल्याचं मानत या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.