मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतली शरद पवारांची भेट

3623

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, पवार साहेबांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री व आमदार अजित पवार, सदानंद सुळे, रेवती सुळे आणि विजय सुळे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

#SharadPawar शरद पवारांबाबत ‘या’ 10 गोष्टी माहित आहेत का?

शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला आणि आज त्यांनी याची 79 वर्षे पूर्ण केली असून 80 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

… म्हणून ‘हे’ 3 दिवस कायम लक्षात राहतात, पवारांनी वाढदिवशी सांगितले गुपित

आपली प्रतिक्रिया द्या