डांबर घोटाळा : प्रकरणाची गुंतागुंत वाढली, फरार आरोपींना जामीन नाकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड जिल्ह्यातील डांबर घोटाळ्यातील तीन फरार आरोपींना पाचव्या जिल्हा न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी जामीन नाकारल्याने या प्रकरणातील गुंतागुंत आणखीनच वाढली आहे.

3 मालक भास्कर कोंडा, मोरे कंन्स्ट्रक्शनचे मनोज रावसाहेब मोरे, कंत्राटदार एस.जी.पद्मावार, सोनाई कंन्स्ट्रक्शनचे मालक सतीश देशमुख, संत्रे कंन्स्ट्रक्शनचे मालक चंद्रकांत संत्रे आणि नुसरत कंन्स्ट्रक्शनचे मालक मोहंमद मोईजोद्दीन अशा सहा कंत्राटदाराविरुध्द भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडे होता. त्यानंतर हा तपास शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्याकडे वर्ग झाला.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने सतीश देशमुख या कंत्राटदाराची बिले बरोबर आहेत असा एक अर्ज पोलिसांना दिला. न्यायालयाने भास्कर कोंडा आणि मनोज मोरे यांना जवळपास शंभर दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर त्यांना नंतर जामीन मंजूर झाला. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले. ज्यात सतीश देशमुखसाठी पोलिसांनी दोषमुक्ती अहवाल पाठविला आणि इतर पाच जणांविरुध्द दोषारोप पाठविले. शंभर दिवस तुरुंगात राहिलेल्या भास्कर कोंडा आणि मनोज मोरे यांना न्यायालयाने दोषारोपपत्र आल्यानंतर जामीन दिला. या दोषारोपात महंमद मोईजोद्दीन महंमद सलिमोद्दीन (46) रा.करखेली, चंद्रकांत शंकर संत्रे (52) कांडाळा ता.नायगाव आणि साईनाथ गोविंदराव पद्मावार (47) रा.भाग्यनगर या तिघांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 299 प्रमाणे फरार आरोपी दाखवले.

दोषारोपपत्र झाल्यानंतर फरार असलेल्या तीन आरोपींनी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान महंमद मोईजोद्दीन या डांबर घोटाळ्यातील कंत्राटदाराच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्यावेळी न्यायालयाने 30 आणि 31 डिसेंबर या दोन दिवसात पोलिसांनी त्याला अटक करु नये असे अंतरीम आदेश दिले होते.

आज या जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल आला. या निकालात न्यायालयाने गुन्ह्याचे गांभिर्य, शासनाची फसवणूक आणि 11 कोटीचा भ्रष्टाचार याबाबींना लक्षात घेत तिन्ही फरार आरोपी महंमद मोईजोद्दीन, चंद्रकांत संत्रे आणि साईनाथ पद्मावार या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.