कॅफे शॉपमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यातील कॅफे शॉपमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कॅफे शॉप (कॉफी कॅफे) करिता नियमाकली जारी केली आहे. त्यानुसार कॅफे शॉपमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असणे आवश्यक आहे.

दोन्ही बाजूस बसलेले लोक एकमेकांच्या सहज दृष्टीस पडतील, यासाठी कॅफे शॉपमधील सर्व दरवाजे पारदर्शक काचेचे असावेत. बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्पष्ट दिसेल, अशी प्रकाशयोजना असावी. कॅफेमधील ग्राहकांच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेणे बंधनकारक असेल तसेच पोलीस व्हिजिट बुक नोंदवही ठेवण्यात यावी, कॅफे शॉपमध्ये कोणतेही गैरकृत्य होऊ नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत.