नर्सिंग अभ्यासक्रम परीक्षेच्या वेळापत्रकावरून संभ्रमावस्था, राज्य सरकारला विद्यार्थ्यांचा टाहो ऐकू जाईन

>>गजानन चेणगे 

पूर्वतयारीसाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्यामुळे राज्यातील बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस तसेच नर्सिंग अभ्यासक्रमांच्या यंदाच्या वार्षिक परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून कळकळीने केली जात असूनही राज्य सरकारला या विद्यार्थ्यांचा टाहो अद्याप ऐकू आलेला दिसत नाही. परीक्षा पूर्वनियोजित वेळीच होणार की, पुढे जाणार याबाबतीत सरकारने कसलाही निर्णय घेतला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील पूर्वनियोजित वेळापत्रक हटवणे, तेच काही दिवसांनी पुन्हा अपलोड करणे अशा कसरती सुरू असल्याने विद्यार्थ्यांमधील संभ्रम आणखीनच वाढला आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यात अनेक महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, नर्सिंगचे शिक्षण घेत आहेत. कोरोना संकटाच्या काळात सगळीकडेच शैक्षणिक वर्षाचे गणित कोलमडले होते. परिणामी याही विद्याशाखांचे ‘आरोग्य’ बिघडून गेले होते. शैक्षणिक वर्षाचे पारंपरिक वेळापत्रक रुळावर आणण्याच्या प्रयत्नात शिक्षण आणि गुणवत्ता याकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्याचेच प्रत्यंतर बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस तसेच नर्सिंग अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या बाबतीत सध्या येत आहे.

सर्वसाधारणपणे शैक्षणिक वर्ष नऊ ते दहा महिन्यांचे असते. या कालावधीत त्या वर्षाचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करणे, त्याची रिव्हिजन घेणे, चाचणी परीक्षा घेणे आवश्यक असते. त्यातून त्या-त्या वर्षीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गळी उतरत असतो; परंतु कोरोनाने बिघडवलेले शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या कालावधीलाच कात्री लावली जात आहे. परिणामी यंदाचे शैक्षणिक वर्ष जेमतेम सात महिन्यांचे राहणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमही उरकला जाणार असल्याने शिक्षण आणि गुणवत्ता याला धक्का पोहोचणार आहे.

तीन-चार महिन्यांपूर्वी या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा 14 डिसेंबरपासून सुरू होत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले होते. तथापि, किद्यार्थ्यांचे क्लिनिकल पोस्टिंग (प्रात्यक्षिक व अंतर्गत कामकाज आदी) हे 1 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, बहुतांश किद्यापीठांनी किद्यार्थ्यांच्या पूर्कतयारी रजादेखील रद्द केल्या आहेत. क्लिनिकल पोस्टिंगनंतर अकघ्या काही दिकसांतच परीक्षेला सामोरे जाके लागत असल्याने किद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा केळ मिळणार नाही. त्यामुळे किद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे या परीक्षा किमान 20 दिवस पुढे ढकलाव्यात, अशी मागणी किद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात आहे. आमदार राजन साळवी, आमदार धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार आदी नेत्यांनी याबाबतीत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला आहे; परंतु राजकारणाच्या धबडग्यात विद्यार्थ्यांचा टाहो सरकारला ऐकू गेलेला दिसत नाही आणि या नेत्यांच्या पाठपुराव्याकडे लक्षही दिले गेलेले नाही.

जुने वेळापत्रक हटवून पुन्हा तेच अपलोड केले

वास्तविक वार्षिक परीक्षेच्या आधी 45 दिवस संकेतस्थळावर वेळापत्रक पडत असते. मागचे वेळापत्रक सुमारे दहा दिवसांपूर्वी संकेतस्थळावरून हटवले गेले होते. त्यामुळे परीक्षा पुढे जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, पाच दिवसांपूर्वी तेच वेळापत्रक पुन्हा अपलोड झाल्याने विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे गोंधळात गोंधळ सुरूच आहे. परीक्षा जुन्या वेळापत्रकाप्रमाणे होणार, की पुढे जाणार याविषयीचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेतच, शिवाय ते तणावातही आहेत.

कोरोना संकटामुळे शैक्षणिक वर्ष बिघडले होते. ते मूळ ट्रकवर आणताना यंदाचे शैक्षणिक वर्ष आकसले आहे. त्याचा ताण विद्यार्थ्यांच्या आकलनावर येणार आहे हे समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत निदान विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जावा.

– वैशाली शिंदे, वैद्यकीय शिक्षण सल्लागार.