
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांना तातडीने मदत द्या आणि त्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिला. राज्यातील अनेक भागात दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही नाही. शेतातील पिके करपून गेली आहेत. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त चर्चा होते, पण ठोस निर्णय घेतला जात नाही. पालकमंत्रीही शेतकऱयांकडे फिरकले नाहीत, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
भटक्या श्वानावर कात्रीने वार
भिंतीलगत शांत बसलेल्या भटक्या श्वानावर सुरक्षा रक्षकाने कात्रीने वार केल्याची घटना मुलुंडच्या डीमार्ट येथे घडली. याप्रकरणी एका श्वानप्रेमी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून सदर सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शी हितेश यादव (21) हा सुरूंग पश्चिमेकडील डीमार्ट येथे खरेदीसाठी गेला होता. त्यावेळी तेथील परिसरात भिंतीला लागून एक भटका कुत्रा बसलेला त्याने पाहिला. त्याचवेळी सुरक्षा रक्षक समीर ठाकूर याने कात्रीने कुत्र्याच्या पायावर मारले.


























































