राहुल गांधी बनले रिक्षावाला; चालकांच्या व्यथा जाणून घेतल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणामध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हैदराबाद येथे रिक्षाचालक, टमटम कामगार आणि सफाई कामगारांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी रिक्षाचालकांचा गणवेशही परिधान केला आणि रिक्षातून फेरफटकाही मारला. त्याचे व्हीडियो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ज्युबली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन हेदेखील उपस्थित होते.  कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधी यांनी रिक्षा चालवताना रिक्षाचालकांशीही संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आपले सरकार आल्यानतंर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी रिक्षाचालकांना आणि कामगारांना दिले.