बेशरम सरकार! विद्यार्थी मार खात होते तेव्हा धर्मेंद्र प्रधान हसत होते; काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

NEET परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉक्रोज जनता पार्टीने सोमवारी संसदेवर धडक मोर्चा काढला. या मोर्चाला थोपवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेवरूनच संसदेतील दोन्ही सभागृहातील कामकाज सोमवारी ठप्प राहिले होते. त्यावेळी संसदेतून बाहेर पडताना धर्मेंद्र प्रधान हे हसत होते. त्यांचा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसने पोलिसांनी तरुणांना केलेल्या मारहाणीचा तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा हसतानाचा व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ”हे सरकार बेशरम आहे! विद्यार्थी मार खात होते तेव्हा धर्मेंद्र प्रधान हसत होते” अशी टीका काँग्रेसने केली आहे.

राहुल आणि प्रियांका गांधी यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन

NEET पेपरफुटी, स्पर्धापरीक्षांमधील गोंधळ याबाबतचा मुद्दा उचलून धरत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत आहेत