मोदी सरकारच्या अत्याचाराला कंटाळून बजरंग पूनियाने हे पाऊल उचलले, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाच्या आरोपांनी बरबटलेल्या बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे ‘डब्लूएफआय’चे नवे अध्यक्ष झाले आहे. यानंतर ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकने तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकला. त्यानंतर कुस्तीपटू बजरंग पूनिया यानेही आपला पद्मश्री हा सन्मान परत केला. पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील फूटपाथवर त्याने तो सन्मान ठेवून दिला आहे. या घटनेनंतर साक्षी मलिक व बजरंग पूनिया यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

खेळाडूंनी प्रियंका गांधी यांची भेट घेतल्याचा व बजरंग पूनियाने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पदक ठेवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत भाजपवर टीका केली आहे. ‘याहून दुखद काय असू शकते. देशाचा सन्मान वाढवणाऱ्या बजरंग पूनियाने त्याचा पद्मश्री सन्मान तप्रधान निवासस्थानाबाहेरील फूटपाथवर ठेवला. बजरंग पूनियाचे म्हणने आहे की मोदी सरकारने त्यांना खोटी आश्वासनं दिली. जेव्हा आंदोलन केले तेव्हा त्रास दिला. आंदोलन स्थळाचे नुकसान केले. आज मोदी सरकारच्या अत्याचाराला कंटाळून बजरंग पुनियाला हे पाऊल उचलावे लागले. हे लाजिरवाणे आहे’, अशी टीका काँग्रेसने केली आहे.