कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार; शरद पवार यांचा दावा, स्पष्ट केले कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्व पक्षांचे नेते रस्त्यांवर उतरून सभा घेत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच या निवडणुकीच्या निकालावर देशभरातील इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होणार आहे. कर्नाटकात या निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिलास अनेक राज्यात भाजप सत्तेवर नाही. इतर राज्यात भाजप नसलेले सरकार आहे. कर्नाटकमधील जनता भाजपवर नाराज आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, असा दावाही शरद पवार यांनी यावेळी केला. आपण धर्मनिरपेक्ष संकल्पना स्वीकारली आहे. निवडणुकीला उभे राहताना आपण ही शपथ घेतो. त्यात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आहे. निवडणुकीत एखादा धर्म किंवा धार्मिक प्रश्न उभे करणे आणि त्यातून वेगळे वातावरण तयार करणे हे देशाच्या दृष्टीने चुकीचे आहे. देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात याचे आश्चर्य वाटते, असेही पवार म्हणाले.