तापमान वाढीचा परिणाम; राज्यातील वीज उपकेंद्रांना कुलरचा गारवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील तापमानाचा पारा चाळिशी पार गेला असून विदर्भ, मराठवडय़ाची तर अक्षरशः भट्टी झाली आहे. त्यामुळे विजेची रेकॉर्डब्रेक मागणी नोंदली जात आहे. ती महावितरणकडून पूर्ण केली जात असली तरी वीज उपपेंद्रांवर कमालीचा ताण येत असून ती प्रचंड गरम होत आहेत. त्यामुळे त्यांचे तापमान प्रमाणाबाहेर वाढून निकामी होऊ नयेत म्हणून त्यांना थंड करण्यासाठी महावितरणकडून विदर्भ, मराठवाडय़ासह ठिकठिकाणच्या वीज उपपेंद्रांना उच्च क्षमतेच्या कुलरच्या माध्यमातून गारवा दिला जात आहे.

महावितरणचे राज्यभरात पावणे तीन कोटी वीज ग्राहक असून त्यांना 4 हजार 94 उच्च दाब वीज उपपेंद्रातील 8 लाख 22 हजार वितरण रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. वीजनिर्मिती पेंद्रांमध्ये तयार होणारी वीज 132/220 केव्हीच्या उच्च दाब वीज वाहिन्यांच्या माध्यमातून येते. ती वीज उपपेंद्रांमध्ये 33/11 केव्हीमध्ये परावर्तीत करून ग्राहकांपर्यंत पोहचवली जाते. वीज उच्च दाबातून कमी दाबात परावर्तीत करताना उपपेंद्रांमधील उपकरणे गरम होतात. त्यातच सध्या तापमानाचा पारा वाढलेला असल्याने उपकरणे आणखी गरम होतात. त्यामुळे ती निकामी होऊन वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरणकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

ज्या वीज उपपेंद्रावर जास्त भार आहे, अशा लातूर, बीड, अमरावती, जालना, चंद्रपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर येथील वीज उपपेंद्रांमधील रिस्विंग रोहित्र, वितरण रोहित्र आणि इतर उपकरणे थंड करण्यासाठी कुलर लावण्यात आले आहेत. सदरचे कुलर चोवीस तास कार्यरत ठेवावे लागत आहेत.