कोरोना बॅकफूटवर जातोय; एका दिवसात ‘अॅक्टिव्ह’ रुग्णांमध्ये 28 हजारांची मोठी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठी घट दिसत आहे. सोमवारी सक्रीय रुग्णांची संख्या 28 हजार 132 एवढ्या मोठ्या संख्येने कमी झाली. म्हणजेच एका दिवसात एकढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाले. याआधी 21 सप्टेंबर रोजी उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येत 28 हजार 653 एकढी सर्वाधिक घट झाली होती.

देशातील एकूण 79 लाख 44 हजार 128 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मागील 24 तासांत 35 हजार 932 नवे रुग्ण आढळले आहेत. 98 दिवसांनंतर प्रथमच 40 हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 21 जुलै रोजी 39 हजार 170 जण कोरोनाबाधित आढळले होते. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे 71 लाख 98 हजार 660 लोक बरे झाले आहेत. मागच्या एका आठकडय़ात 1.18 लाख अॅक्टिक्ह रुग्ण कमी होण्याचा रेकॉर्ड झाला आहे. दररोज सरासरी 12 हजार अॅक्टिक्ह रुग्ण कमी होत आहेत.

मृतांचा आकडा कमी
सोमवारी 482 रुग्णांचा मृत्यू झाला. 113 दिवसांनी दुसऱ्यांदा मृतांचा आकडा 500 पेक्षा कमी झाला. याआधी 5 जुलै रोजी 421 जण मृत्युमुखी पडल्याची नोंद होती. कोरोनामुळे देशात आतापर्यंत एक लाख 19 हजार 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या पार
जगभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये हिंदुस्थानचा रिकव्हरी रेट सर्वाधिक चांगला आहे. हिंदुस्थानचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांचा वर आहे. म्हणजेच 100 रुग्णांपैकी 90 रुग्ण बरे होत आहेत. हिंदुस्थानखालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. ब्राझीलचा रिकव्हरी रेट 89.65 टक्के, रशियाचा 74. 84 टक्के आहे. सर्वात वाईट अवस्था फ्रान्सची आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 9.69 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.