कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात आढळले 36 हजार 469 रुग्ण

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 36 हजारहून अधिक रुग्ण सापडले असून 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या 79 लाखांच्या वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 36 हजार 469 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 79 लाख 46 हजार 429 वर पोहोचली आहे. असे असले तरी आतापर्यंत 72 लाख 1 हजार 70 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1लाख 19 हजार 502 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 63 हजार 842 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात गेल्या काही दिवसांत कोरोना संकट कमी होताना दिसत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून कोरोना लागण होण्याचे प्रमाणही कमी होत आहे. देशात सध्या 6 लाख 25 हजार 857 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या