#Corona पंतप्रधान मोदींनी ‘जे बोललं ते करूनही दाखवलं’, पण योगी मात्र विसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केले. मंगळवार मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभरात पुढील 21 दिवस लॉकडाऊन असणार आहे, आणि प्रत्येक गाव, शहर बंद राहणार त्यामुळे लोकांनाही घरात बसावे, रस्त्यावर उतरू नये, असे आवाहन मोदींनी केले. सोशल डिस्टनसिंग हाच कोरोनाची महामारी रोखण्याचा पर्याय असल्याचे ते म्हणाले. हा निर्णय सर्वांना अगदी पंतप्रधानांनाही लागू असल्याकॅगे ते म्हणाले, आज त्याचा प्रत्यय देखील आला.

मंगळवारी ही घोषणा केल्यानंतर बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठलं पार पडली. या बैठकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोदींनी जे बोललं ते करूनही दाखवलं असेच लोक बोलत आहेत. या बैठकीत सहभागी झालेले नेते एकमेकांपासून एक मीटर अंतर राखून खुर्चीवर बसले होते. पंतप्रधान मोदी मध्यभागी बसले होते, त्यांच्या डाव्या बाजूला गृहमंत्री अमित शाह, उजव्या बाजूला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बसले होते आणि मंत्रिमंडळातील इतर सहकारी समोर अंतर राखून बसले होते.

screenshot_2020-03-25-14-01-46-988_com-android-chrome_copy_700x450-modi

योगींवर टीका
एकीकडे मोदी स्वतः सोशल डिस्टनसिंग पाळत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अयोध्येत पोहोचले. त्यांनी भगवान रामलल्ला यांना तंबूतून बाहेर काढत अस्थायी मंदिरात ठेवले. मात्र योगींची ही कृती विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आली आहे.

screenshot_2020-03-25-14-02-17-011_com-android-chrome_copy_700x450-yogi

उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते अजय कुमार लल्लू यांनी म्हटले की, नवरात्रीचा पहिला दिवस आहे. देवीच्या दरबारात दर्शनासाठी जाण्याची माझीही इच्छा होती. परंतु मी मोदींनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन केले. परंतु योगींनी त्याला केराची टोपली दाखवली. ज्या राज्याचा मुख्यमंत्री गर्दी जमवून दर्शनासाठी जात असेल तेथील जनता पंतप्रधान मोदी यांचे कसे ऐकेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

screenshot_2020-03-25-14-02-32-937_com-android-chrome_copy_700x450-yogi1