कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘या’ दुकानदाराने अशी लढवली शक्कल; नेटकऱ्यांनी केले कौतुक

3007

जगभरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनीं केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अनेक नागरिकांनी किराणा मालाच्या दुकानांवर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पंतप्रधानांनीं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशाच पद्धतीने आपण या रोगाचा संसर्ग टाळू शकतो. असे असतानाही काही नागरी या आवाहनाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशातच एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिलं आहे, ‘आवश्यक वस्तूंचा पुरवठा करताना दुकानदार आणि ग्राहकांनी असे शारीरिक अंतर राखले पाहिजे.’ हा फोटो केरळमधील दुकानदाराचा आहे. यामध्ये एक महिला पिशवी घेऊन उभी आहे आणि दुकानदार अंतर राखून पाईपच्या साहाय्याने महिलेने आणलेल्या पिशवीत धान्य देत आहे. हा फोटो पाहून अनेक नेटकरी या दुकानदाराच्या पद्धतीचे कौतुक करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या