
कोरोना प्रसाराचा धोका असल्यामुळे मास्क घालूनच घराबाहेर पडावे असे सक्त निर्देश दिले असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मास्क न घालता फिरणाऱयांना पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. यामध्ये 20 एप्रिलपासून 26 सप्टेंबरपर्यंत 14 हजार 234 जणांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शिंकताना किंवा खोकताना नाकावर-तोंडावर रुमाल किंवा मास्क नसल्यास कोरोनाचा विषाणू दुसऱयाच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क कापरणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. आता 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 रु. (दोनशे रुपये) करण्यात आला आहे.
अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत सर्वाधिक कारवाई
पालिकेच्या के/पश्चिम म्हणजेच अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 918 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 लाख 21 हजार 200 रुपये कसूल करण्यात आले आहेत.
13 सप्टेंबरपासून 9 हजार जणांवर कारवाई
- मुंबईत 20 एप्रिल ते 12 सप्टेंबर या कालावधीत 4989 जणांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने 33 लाख 68 हजार 500 रुपयांची वसुली केली आहे.
- तर दंडाची रक्कम 200 रुपये केल्यानंतर 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 9 हजार 245 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 19 लाख 13 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


























































