राज्यातील 18 टक्के जनतेची कोरोना चाचणी

राज्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना राबविली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार 15 सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली. ही मोहीम अत्यंत प्रभावीरीत्या राज्यभरात राबविली जात असून राज्यातील 18 टक्के म्हणजे 2 कोटी 83 लाख 63 हजार लोकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी ट्विट करून माहिती दिली आहे.

  • 15 सप्टेंबरपासून मोहीम सुरू झाल्यानंतर आठवडाभरातच आरोग्य पथके 70 लाख 75 हजार 782 घरांपर्यंत पोहोचली आहेत.

मुंबईत 62 हजार घरांना भेटी

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी, सर्केक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 62319 घरांना भेटी देण्यात आल्या आहेत.

  • राज्यात 55,268 आरोग्य पथके
  • 70.75 लाख कुटुंबांची तपासणी
  • 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी
  • 37,733 संशयितांपैकी ४५१७ कोविड रुग्ण सापडले

आपली प्रतिक्रिया द्या