Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘1 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, February 1, 2023)
नाती जपा. धार्मिक स्थळाला भेट द्याल. महिलांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिचे आशीर्वाद घ्या. आपल्या कामात मन एकाग्र करा. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात प्रगती करण्यासाठी सरस्वती आणि गणपतीची आराधना करावी. कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
शुभरंग : सोनेरी

वृषभ (TAURUS – Wednesday, February 1, 2023)
मनातील नकारात्मक विचार दूर होतील. अडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. शिक्षण क्षेत्रात प्रगती कराल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुलाबी रंगाचा पोषाख परिधान करा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. आपल्या आवडत्या व्यक्तिची भेट होईल. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.
शुभरंग : सोनेरी

मिथुन (GEMINI – Wednesday, February1, 2023)
विविध आव्हानांचा सामना करावा लागेल. उगाच निराश होऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. निसर्गाविषयी कृतज्ञ राहा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. समुद्रकिनारी फिरायला जाल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. श्रीविष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा.
शुभरंग : खाकी

कर्क (CANCER – Wednesday, February 1, 2023)
आजची कामे आजच आणि वेळेवर पूर्ण कराल. कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावाल. घरातील तुटलेल्या काचवस्तू वेळीच घराबाहेर काढा. जास्त चहा पिऊ नका. गरिबांना फळांचे दान करा. आरोग्याची काळजी घ्या. घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. आज तुम्हाला तुमची आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ मिळेल.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Wednesday, February1, 2023)
धार्मिक कार्यानिमित्त प्रवास घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील. मनात नकारात्मक विचार आणू नका. लोकं आपल्याविषयी काय विचार करतात, याचा फार विचार करू नका. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. देवळात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक करा. शंकराला बेलपत्र वाहा.
शुभरंग : नारिंगी

कन्या (VIRGO – Wednesday, February 1, 2023)
शिक्षण क्षेत्रातील नव्या बदलांना सामोरे जावे लागेल. एखादे आवडीचे पुस्तक बऱ्याच दिवसांनी हाती लागल्यामुळे वाचनात दंग व्हाल. परदेश प्रवासाचा योग आहे. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. गायीला चार खाऊ घाला. धनलाभ होईल. नोकरीत बदल करताना काळजी घ्यावी लागेल.
शुभरंग : लाल

तूळ (TULA- Wednesday, February 1, 2023)
नवीन छंद जोपासावेसे वाटतील. दैनंदिन दिनक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सकारात्मक वातावरण ठेवा. ज्येष्ठ व्यक्तिंचा अनादर करू नका. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तरुणांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आवडता पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग : काळा

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, February 1, 2023)
तुमच्या गुरुंची तुमच्यावर कृपा राहिल. कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडाल. कार्यालयातल मनाला समाधान देणारी घटना घडेल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. विशेष मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत कटुतेने वागू नका. शेतकरी आणि व्यावसायिकांनी व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आई-वडीलांची सेवा करा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : हिरवा

धनु (SAGITTARIUS – Wednesday, February 1, 2023)
आर्थिक उत्पन्नाकरिता प्रयत्न कराल. कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. देवदर्शनाचा आनंद कुटुंबियांसोबत घ्याल. गणपतीला जास्वंदाचे फूल आणि दुर्वा वाहा. मनासारख्या सर्व गोष्टी जुळून येतील. घरात नव्या सुशोभिकरणाच्या वस्तू आणाल. मन प्रसन्न ठेवा.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Wednesday, February 1, 2023)
यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. सकाळी कोवळ्या उन्हात चालायला जा. घरातील फुलदाणीत तीन मोरपिसे ठेवा. घरात सप्तशतीचा पाठ कराल. आवडती कला जोपासाल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ द्याल. दुरच्या प्रवासाचे बेत आखाल. गरिबांना पांढऱ्या रंगाची मिठाई वाटा. कोणावरही अनावश्यक रागवू नका.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, February 1, 2023)
उत्साहाने कामाला लागाल. धनप्राप्तीसाठी प्रयत्न कराल. नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. नकारात्मक बोलू नका. अन्नदान करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नातेवाईक अनपेक्षित घरी येतील. जोडीदाराकडून अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळेल. आर्थिक व्यवहार करताना चुका करू नका.
शुभरंग : पांढरा

मीन (PISCES – Wednesday, February 1, 2023)
कामात आत्मविश्वास वाढेल. कोणतेही काम पूर्ण करण्याआधी त्याचे नियोजन करा. मित्रांचा सल्ला फायद्याचा ठरेल. कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावा. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. घरात शंकराची आरती म्हणा. आपल्या प्रिय व्यक्तिसोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. आवडते संगीत ऐकाल.
शुभरंग : हिरवा